
“MLA Vijay Deshmukh leads BJP’s aggressive campaign in Solapur over city limit dispute.”
Sakal
सोलापूर : शहर भाजपत वाद उफाळून आला आहे. आमदार विजय देशमुख आणि शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी जाहीरपणे एकमेकांविरुद्ध वक्तव्ये देण्यापर्यंत विषय पुढे गेला आहे. कोणी कार्यकर्त्यांना त्रास देईल तर कमरेत लाथ घाला, असे म्हणण्यापर्यंत वाद विकोपाला गेला आहे. याच्या मुळाशी शहर उत्तर आणि शहर मध्य या दोन विधानसभा मतदारसंघांतील हद्दनिश्चितीचा वाद आहे.