Solapur News: 'नागदेवतेचे पूजन अन् आनंदाचा झोका'; सोलापूर शहर परिसरात नागपंचमी उत्साहात साजरी
घरोघरी महिलांनी नागदेवतेला भाऊ म्हणून पूजन करून भावाच्या दीर्घायुष्याची मनोकामना केली. पारंपारिक वेशभूषा करून महिलांनी ठिकठिकाणी झोका खेळण्याचा आनंद लुटला. झोका खेळताना महिलांचा आनंद व चैतन्याच्या लहरी सणाची शोभा वाढवत होत्या.
Devotees in Solapur offer milk to serpent idols while children enjoy the traditional “Anandacha Zoka” swings on Nag Panchami.Sakal
सोलापूर : नागनाथ मंदिरांमध्ये मंगळवारी महिलांनी नागदेवतेचे पूजन करून नागपंचमी सण भक्तिभावात साजरा केला. अनेक ठिकाणी उभारलेल्या झोक्यावर पिंगा घेत आनंद घेतला. शहरातील विविध नागमंदिरात पूजनासाठी व दर्शनासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती.