

Solapur Municipal Corporation building after official gazette publication of civic election results.
Sakal
सोलापूर : महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या निकालांचे अधिकृत राजपत्र आज प्रसिद्ध करण्यात आले. यामुळे १०२ प्रभागांतील निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांच्या निवडीला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. नव्या महापालिका स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. सोलापूर महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी हे राजपत्र आज प्रसिद्ध केले आहे.