

Solapur POCSO Case Accused Flees During Medical Checkup At Civil Hospital Police Arrest Him After Four Hours
sakal
सोलापूर : येथील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील गोंधळे वस्तीतील चेतन राजू मस्के (रा. गोंधळे वस्ती, एमआयडीसी रोड, सोलापूर) याच्यावर जोडभावी पेठ पोलिसांत ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याला आज (बुधवारी) दुपारी वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलला आणले जात होते. त्यावेळी त्याने पोलिसांना हिसका मारला आणि हॉस्पिटलसमोरील उर्दु घराच्या १० फूट भिंतीवरून उडी मारून पळून गेला. जोडभावी पेठ पोलिसांच्या पथकाने त्याला चार तासात पकडले.