रखडलेल्या कामांसाठी निधी मंजूर; जिल्हाधिकाऱ्यांचा मंगळवेढा दौरा यशस्वी

रखडलेल्या बांधकामाची पाहणी केली होती त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा मंगळवेढा दौरा सफल झाला.
Collector
Collector Sakal

मंगळवेढा : येथील रखडलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या उर्वरीत कामकाज करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून दाखल केलेल्या 23 लाख 36 हजार च्या निधीच्या प्रस्तावास मंजुर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सही केली. याबाबत काल या रखडलेल्या बांधकामाची पाहणी केली होती त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा मंगळवेढा दौरा सफल झाला.

चोखोबा स्मारकाच्या स्थळनिश्‍चीतीसाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगळवेढा दौरा केला होता तहसील कार्यालयात बैठक आटोपून त्यांनी या रखडलेल्या कामाची पाहणी केली यावेळी नगरविकास अधिकारी आशिष लोकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक रविकांत माने, रतनचंद शहा बॅकेचे अध्यक्ष राहूल शहा पक्षनेते अजित जगताप, तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी, नगरसेवक प्रविण खवतोडे लतीफ तांबोळी, मुख्याधिकारी निशीकांत प्रचंडराव उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर व बांधकाम खात्याचे उपअभियंता शैलेश गुंड आदी उपस्थित होते यावेळी उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील यांच्याकडून रखडलेल्या माहिती घेतली.

Collector
बालविवाह बेतला जिवावर; प्रसूती उपचारादरम्यान गर्भवतीचा करुण अंत

सध्या सबजेलच्या बांधकामासाठीही निधीची मागणी करण्यात आली.मंगळवेढयात प्रांत कार्यालय असल्याने डी.वाय.एस.पी.कार्यालयही मंगळवेढयातच असावे अशी मागणी नागरिकांची केल्याने स्व. आ. भारत भालके यांनी प्रयत्न केले. सुरुवातीस 18 लाख 60 हजार रुपये मंजूर झाल्यानंतर इमारत बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. मंजूर निधीतून इमारत पूर्ण होवू न शकल्याने गेली दोन वर्षे या इमारतीचे अर्धवट स्थितीत काम रखडले होते.

तत्कालीन उपविभागीय अधिकारी दिलीप जगदाळे यांनी स्वयसेवी संस्थाच्या माध्यमातून वृक्षारोपण केल्यामुळे परीसर पर्यावरण युक्त झाला मात्र दरवाजे, प्लस्टर, खिडक्या रंगरंगोटी इतर सुशोभिकरण काम निधी नसल्याने रखडले होते त्यामुळे या कार्लायाचे स्थलांतर देखील थांबले होते सन 2020-21 मध्ये वाढीव निधीसाठी प्रस्ताव दाखल केला होता. हा वाढीव निधी 23 लाख 36 हजार डिसेंबर महिन्यात जिल्हा नियोजन मंडळाकडून गत महिन्यात प्रस्ताव दाखल केला.

Collector
वारजे : अल्पवयीन मुलाचा पाठलाग करून टोळक्‍याकडून गोळीबार

यासंदर्भात पक्षनेते अजित जगताप यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे लेखी मागणी केली होती. या मंजूर निधीतून काम झाल्यास शहरात असलेल्या उपविभागीय कार्यालयाचे स्थलांतर झाल्याने ही जागा प्रास्तावित चोकोबा स्मारकासाठी उपलब्ध होऊ शकेल असे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या जिल्हाधिकारी पदास सोलापूरात दोन वर्षे पुर्ण झाल्याबददल या आवारात सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com