
सोलापूर : शहराच्या शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात येत आहे. १ जानेवारी ते १६ जून या साडेपाच महिन्यांत पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी २९ जणांना तडीपार केले आहे. याशिवाय आणखी २५ सराईत गुन्हेगार तडीपारीच्या यादीत आहेत. त्यांच्या वर्तनात बदल न झाल्यास त्यांच्यावरही तडीपारीची कारवाई अटळ आहे.