Solapur News: ताकबी फुंकून प्यायची येळ

संपूर्ण देशातच पिछेहाट झालेल्या काँग्रेसचे सोलापुरातबी लईच वंगाळ परिस्थिती झालीया...
Congres News, Solapur News
Congres News, Solapur Newssakal
Updated on

गेल्या पाच वर्षांपासून अध्यक्ष असलेल्या प्रकाश मालकास्नी हटवून आपण अध्यक्ष व्हावं म्हनूनशान काही इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले हुते... पण सायबांच्या मर्जीवर समदं अवलंबून हुतं... मालकास्नी हटवण्यात पक्षाचं मोठ्ठ नुकसान हुतं.. कारण एक समाज पक्षापास्न दूर जाणार हे निश्‍चित हुतं... तरीबी त्येंची टर्म संपल्याचं कारण फुढं करत त्येस्नी हटवून भाऊला अध्यक्षपदावर बसवलं !(Solapur News)

संपूर्ण देशातच पिछेहाट झालेल्या काँग्रेसचे सोलापुरातबी लईच वंगाळ परिस्थिती झालीया... महापालिका, जिल्हा परिषद, आमदार, खासदार अशा समद्या ठिकाणी काँग्रेसचं वर्चस्व हुतं... एकेकाळी महापालिकेवर झेंडा लावलेल्या काँग्रेसची स्थिती अत्यंत शोचनिय झालीया... पण आता मातूर केवळ एक आमदार व सोलापूर महापालिकेत १४ नगरसेवक राह्यल्याती... ताई एकमेव आमदार असून जिल्हाभर किल्ला लढवत हाय... सायबांचा लोकसभेत दोनयेळा पराभव झालाय... या सगळ्या पार्श्‍वभूमिवर सत्तेची गणितं काही बदलण्याची चिन्हं नसतानाबी या पडक्या वाड्याची पाटीलकी स्वीकारण्यासाठी काहींनी फिल्डींग लावली हुती... प्रकाश मालकाचं कसं चुकतंया हे सांगत पेपरामधी नेहमी इरोधात कागाळ्या करण्याची अहमहमिका सुरुच हुती... तरीबी मालकास्नी बदलण्यासाठी सायब काही तयार होत नव्हते.

.. गेल्या कित्येक वर्षापास्न सायबाच्या फुढं-मागं करणाऱ्या भाऊचा इचार सायबांनी या पदासाठी केला अन् सध्या त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली. रामलाल चौकात हार-तुऱ्यांना अन् गुलालांच्या उधळणीला जोर चढला... आमचा भाऊ अध्यक्ष झाल्याची भावना कार्यकर्त्यात हुती... लेझीम संघ, नवरात्र मंडळ, गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातनं फुढं आलेल्या भाऊनं तब्बल पाचयेळा महापालिकेवर झेंडा फडकाविला हाय... तात्यांचं वरदहस्तबी भाऊवर लईच मोठ्ठं हुतं... तात्यानंतर भाऊनं थेट सायबांच्या जाई-जुईवर हजेरी लावू लागले... सायबांच्या गळ्यातील ताईतच बनले ते..!

तवापास्न सायबाच्या मनात हुतंच.. कारण भाऊ पाचयेळा निवडून येऊनबी त्येस्नी महापालिकेत किंवा पक्षात मानाचं पान मिळालं नव्हतं... महापालिकेच्या गटनेत्यापतूरच त्येंची उडी गेली. आता पक्ष तरी अडचणीत हाय... परंतु शहराबरोबरच भाऊचा समाजही मोठा मतदार हाय... त्यात भाऊ आपला कट्टर समर्थक... या सगळ्याची गोळाबेरीज करीत सायबांनी भाऊला पद दिलं... भाऊ कुटुंबासह बालाजीच्या दर्शनाला तिरुपतीला गेल्तं... तिथून थेट अचानक मुंबईत येण्याचा आदेश मिळाला... सायबांनी कानात सांगितलं... पत्र हातात पडेपर्यंत कुणास सांगू नको म्हनूनशान... मुंबईत प्रदेशाध्यक्ष नानांकडनं पत्र घेण्यासाठी जाताना स्वतः सायब सोबत आल्ते... तवाच यावर शिक्कामोर्तब झाला... तवा सायबांसकट सगळ्यांच्याच जीवात जीव आला !

तसं तर प्रकाश मालकाचंबी असंच काहीसं झाल्तं... दहा-बारा वर्षांपूर्वी एकदा सायबांनी त्येस्नी अध्यक्षपदासाठी तुमची निवड करतो, असा शबुद दिला हुता... यंदा पक्क समजा असंबी सगितलं हुतं... तवा प्रकाश मालकांनी आपली बुलेट काढून कमानी मारणाऱ्यास्नी सोबत घेऊन सोलापुरातलं सात रस्ता, बाळीयेस, जिल्हा परिषदसमोर, शिवाजी चौक, हुतात्मा चौक अशी सगळी महत्त्वाची ठिकाणं दाखवून तिथं कमानी लावायची अन् बॅनरवर आपल्या अन् सायबाच्या फोटोच्या येगयेगळ्या कॉपीबी लावण्यास बजावलं हुतं... बजेट, जागा, फोटो असं समदं फायनल झालं पण तवा अध्यक्षपदाची माळ हुकली.. तवा नाराज झालेल्या मालकांनी दुसऱ्यायेळी मातूर सावध पवित्रा घेत पदाचं पत्र हाती पडल्यानंतरच जाहीर केलं, पण अनुभवातनं बॅनर, कमानी, फोटो या समद्याचा नाद सोडला... हा इतिहास असल्यानं दूध पोळल्यानं ताक बी फुंकून प्यायची येळ भाऊवर आल्ती !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com