सोलापूर : कोरोना वाढतोय, पण टेस्टिंग कमीच! रुग्णाला ७ दिवस ‘होम आयसोलेशन’ बंधनकारक

कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्यास सात दिवस होम आयसोलेशन बंधनकारक आहे. दुसरीकडे लक्षणे आहेत, पण कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असलेल्यांना देखील सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचे बंधन आहे.
mask use
mask usesakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. सध्या शहरात ४४ तर ग्रामीणमध्ये २४ सक्रिय रूग्ण आहेत. मंगळवेढा, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर हे तीन तालुके कोरोनामुक्त आहेत. सध्या माढा, पंढरपूर व सांगोला या तीन तालुक्यात सर्वाधिक १६ रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही अद्याप संशयितांच्या चाचण्या वाढलेल्या नाहीत.

अक्कलकोट, करमाळा, माढा, माळशिरस, मोहोळ या तालुक्यातील शहरी भागात कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण नाही. त्या पाचही तालुक्यातील ग्रामीणमध्येच रुग्ण आहेत. पंढरपूर ग्रामीणमध्ये चार व शहरात तीन असे एकूण सात रुग्ण त्या तालुक्यात आहेत. दुसरीकडे सांगोला तालुक्यातील चार रुग्णांमध्ये एक शहरातील आहे.

शहरात जुळे सोलापूर, सदर बझार, जुना विडी घरकूल या परिसरात इतर नगरांच्याय तुलनेत त्याठिकाणी अधिक रुग्ण आहेत. आतापर्यंत ग्रामीणमधील एक लाख ८७ हजार ४८० जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी तीन हजार ७३१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले, पण रुग्ण पुन्हा वाढत आहेत.

आतापर्यंत शहरातील ३४ हजार ७०५ जणांना कोरोनाची बाधा झाली असून सध्या ४४ रुग्ण उपचार घेत आहेत. वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंग व ट्रीटमेंट अत्यंत महत्त्वाची आहे. पण, टेस्टिंगच कमी असल्याने ट्रेसिंग व ट्रीटमेंट करण्यास अडचणी येत असल्याची वस्तुस्थिती आहे.

रुग्णाला ‘होम आयसोलेशन’ ७ दिवस बंधनकारकच

‘आयसीएमआर’च्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार दररोज दहा लाख लोकसंख्येमागे १४० संशयितांची टेस्टिंग अपेक्षित आहे. पण, तेवढे सुद्धा टेस्टिंग सध्या होत नाही, हे विशेष. दरम्यान, कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्यास सात दिवस होम आयसोलेशन बंधनकारक आहे. दुसरीकडे लक्षणे आहेत, पण कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असलेल्यांना देखील सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचे बंधन आहे. सध्या एकूण रुग्णांपैकी शहरातील चार ते पाच जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Punyashlok Ahilyadevi Holakar univercity, solapur
Ashadi Wari
farmer waiting for rain
 Inspector of Police
Marathi News Esakal
www.esakal.com