तुमच्या पेक्षा दाऊद, छोटा राजन, गवळी बरा की....

तुमच्या पेक्षा दाऊद, छोटा राजन, गवळी बरा की....

सोलापूर : मिळकत कराच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने डिजीटल फलकांचा आधार घेतला आहे. या फलकांवर थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध करून वसुली सुरु झाली आहे. या प्रकारास एका स्मार्ट सोलापूरकराने तीव्र आक्षेप घेतला आहे. थकबाकीदारांची नावे जरूर झळकवा, त्याचवेळी महापालिकेत टेबलाखालून पैसे घेऊन कामे करणारे, ज्या ठिकाणी पाणी मुरतय त्या ठिकाणची वसुली न करणाऱ्यांचेही नाव झळकावण्याची हिंमत प्रशासनप्रमुख दाखवतील का, असा प्रश्‍नही उपस्थित केला आहे. 

सर्वसामान्य जनतेच्या कष्टाचे पैसे हडप करणाऱ्यांवर कारवाई न करता बोटचेपे धोरण घेणाऱ्या प्रशासनापेक्षा दाऊद, छोटा राजन, गवळी बरा की...असा उल्लेख करीत या स्मार्ट सोलापूरकराने महापालिका प्रशासनाच्या कारभाराची खिल्ली उडवली आहे. आपण सुरु केलेली हप्ता वसुली फारच मर्दाचे काम करत आहात, त्याबद्दल आपला आभारी आहे. पण ज्या ठिकाणी पाणी मुरतंय त्या ठिकाणची वसुली करण्याची हिंमत दाखवा. हप्ता वसुलीसोबत तुमच्या निष्क्रिय कौतुकास्पद कामांची पोस्टर्स लावा नावासकट, ही हिंमत दाखवता का? गोळा केलेल्या पैशातून जनतेची कामे केलात तर तुम्हाला व परिवारास आशिर्वाद भेटेल. अन्यथा तुमच्या कामाचे स्वरुप आणि वसुलीचे स्वरुप पाहिले तर तुमच्या पेक्षा दाऊ, गवळी, छोटा राजन, पुजारी बरा की... अशी उपरोधिक टीकाही या स्मार्ट सोलापूरकराने केली आहे. जनतेच्या करातून मिळणाऱ्या पगाररुपी मिठाला जागा आणि धनदांडग्यांची नावे डिजीटल पोस्टरवर झळकवा, असे आव्हानही दिले आहे. 

हद्दवाढीतील डिजीटल लावण्यास टाळाटाळ 
शहरातील लखपती थकबाकीदारांचे डिजीटल लावण्याची तत्परता कर संकलन विभागाने दाखवली. मात्र हद्दवाढीतील लखपती थकबाकीदारांचे डिजीटल लावण्याचे धाडस संबंधित विभागाकडून दाखविले गेले नाही. हद्दवाढ भागामध्ये महापालिकेतील अनेक पदाधिकारी, नगरसेवकांच्या अनेक जागा, खुले प्लॉट आहेत. हे त्यांच्या नावावर नसल्या तरी कर मात्र तेच भरत असतात. अशा सुमारे 567 लखपती थकबाकीदारांची यादी हद्दवाढ विभागाच्या कर संकलन विभागाने तयार केली आहे. मात्र नावे तपासणीच्या नावाखाली ती नावे डिजीटल फलकावर झळकविण्यास टाळाटाळ केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com