सोलापूर विधान परिषदेसाठी न्यायालयात जाणार; देशमुख | Sangola | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shrikant deshmukh
सोलापूर विधानपरिषदेसाठी न्यायालयात जाणार : भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा इशारा

सोलापूर विधान परिषदेसाठी न्यायालयात जाणार; देशमुख

सांगोला : राज्यातील विधान परिषदेचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून यामधून सोलापूर जिल्ह्याला वगळण्यात आलेले आहे. महाविकास आघाडीने सत्तेचा गैरवापर करून हा खटाटोप केला आहे. त्यामुळे या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी भाजपने केली असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी दिली आहे.
पूर्वीच्या नगरपालिका आणि नगरपंचायती महापालिका आणि जिल्हा परिषदेचे जवळपास ४१५ पैकी ४१० मतदार पात्र आहेत. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यकारी मंडळातील ७५ टक्के पेक्षा अधिक सदस्य पात्र ठरतात.

त्यामुळे सोलापूर जिल्ह्याची निवडणूक होवू शकते. मात्र, या निवडणुकीतून सोलापूर जिल्ह्याला वगळण्यासाठी नव्याने घोषित झालेल्या सहा नगरपंचायती आणि मुदत संपलेल्या मोहोळ, माढा आणि माळशिरस या तीन नगरपरिषदा गृहीत धरून जिल्ह्यातील आकडेवारी चुकीची दाखवण्यात आली आहे. चुकीची आकडेवारी दाखवून जिल्ह्यातील विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्याचा खटाटोप राज्य शासनातील काही मंडळींनीच केला असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केला आहे. त्यासाठी आता थेट न्यायालयात जाण्याची आमची तयारी असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा: जप्त वाळूसाठ्याचा १७ नोव्हेंबरला लिलाव

जिल्ह्यात भाजपची मोठी ताकद असून विकास आघाडी या निवडणुकीला घाबरली आहे. त्यामुळे जिल्ह्यात होणारी नामुष्की टाळण्यासाठी हा प्रकार केला असून याला आता न्यायालयात दाद मागू, असा इशारा देशमुख यांनी दिला.
नामुष्की टाळण्यासाठी खटाटोप
सोलापूर विधानपरिषदेतील नामुष्की टाळण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्यातील प्रशासनाला हाताशी धरून हा उद्योग, खटाटोप केलेला आहे. पालकमंत्र्यावरती कोणाचा दबाव आहे. हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे, असेही श्रीकांत देशमुख यांनी सांगितले.

loading image
go to top