Solapur Crime: साेलापूरात गंभीर मारहाण प्रकरणी पिता-पुत्रास शिक्षा; मित्राच्या मुलीला त्रास देऊ नको म्हटल्याने केला होता खुनी हल्ला!

court punishment in Solapur crime case: मित्राच्या मुलीला छेडणे थांबवण्याचा सल्ला दिल्याचा राग मनात ठेवून कोयता व लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला; न्यायालयाने समझोता फेटाळत पाच वर्षांची शिक्षा व दंड ठोठावला
Father and son convicted in Solapur assault case over harassment dispute.

Father and son convicted in Solapur assault case over harassment dispute.

sakal
Updated on

सोलापूर : ‘मित्राच्या मुलीला पुन्हा त्रास देऊ नको’ असे समजावून सांगितल्याच्या रागातून ओंकार तुकाराम खुळे व त्याचा वडील तुकाराम ऊर्फ मुन्ना खुळे (दोघेही रा. एनजी मिल चाळ, मुरारजी पेठ) यांनी नवनाथ खरात यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यात तपासी अंमलदाराचे जबाब झाल्यावर फिर्यादी व संशयित आरोपींमध्ये समझोता झाला आणि तसा अर्ज त्यांनी न्यायालयात दिला. मात्र, न्यायालयाने तो अमान्य करीत सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून संशयितांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com