

Solapur Crime - घरपोडी प्रकरणातील संशयिताला तपास कामासाठी पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावल्यावर या प्रकरणात होणारी अटक टाळण्यासाठी संशयित आरोपीने स्वतःहून विषारी औषध प्राशन करून पोलीस ठाण्यात हजेरी लावली दरम्यान सतर्क पोलीसांनी तात्काळ उपचारासाठी दाखल केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
पोलिस सूत्राने दिलेली माहितीनुसार यापूर्वी चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत तपासांच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील आरोपीकडे तपास सुरू आहे.याच घरफोडी प्रकरणात शशिकांत शिवाजी घाडगे रा.अरबळी ता. मोहोळ या संशयित आरोपीस घरफोडी प्रकरणात जबाब घेण्यासाठी बोलावले.
तत्पूर्वी त्याने स्वतःहून औषध पिण्याची कबुली दिली,त्यास तात्काळ पोलीसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसाहेब पिंगळे यांच्या खासगी वाहनातून खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आपल्याला पोलिसांनी अटक होऊ नये म्हणून या कारणासाठी पिल्याचे पोलीसांना दिलेल्या जबाबात सांगितले. सदर आरोपीने यापूर्वी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात असा प्रकार केला होता,रूग्ण आरोपीची प्रकृती ठीक असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.