सोलापूर : बार्शीत भरदिवसा वृद्ध महिलेला लुटले

६५ हजारांचा ऐवज लंपास, एकावर गुन्हा दाखल
chain snatching
chain snatchingsakal
Updated on

बार्शी : भाऊजयीच्या वर्षश्राद्धासाठी कळमण येथून बार्शी बसस्थानकावर उतरुन बार्शीतील भावाच्या घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या भामट्याने वृद्ध महिलेस आजी तुला घरी सोडतो, असे सांगून दुचाकीवरुन नेऊन सोन्याचे दागिने व कर्णफुले काढून घेऊन भरदिवसा ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सरस्वती जालिंदर शिंदे (वय ७५, रा. कळमण, ता. उत्तर सोलापूर) या वृद्ध महिलेने अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून ही घटना बार्शी एसटी बसस्थानकासमोर दुपारी दीडच्या दरम्यान घडली. शिंदे या दुपारी साडेबाराच्या दरम्यान बीबीदारफळ येथून निघून बार्शी येथील बस स्थानकावर दुपारी दीडच्या दरम्यान आल्या.

chain snatching
सोलापुरातील तुरुंग कैद्यांनी झाले हाउसफुल्ल

बसस्थानकाबाहेर केळीच्या हातगाडीवर केळी घेऊन रिक्षा चालकास बोलावीत असताना एक तरुण त्यांच्या जवळ आला. आजी तू मला ओळखले का, खूप दिवस मी पुण्यात होतो, तुला घरी सोडतो, असे म्हणून त्याने मला दुचाकीवर बसवले आणि तुळजापूर रस्त्याने घेऊन गेला. थोडे गावाबाहेर जाताच त्या तरुणाने मला सांगितले. पुढे चोरटे आहेत सोने काढून ठेव त्यांनी पाहिले तर आपल्याला सोडणार नाहीत. तीन ग्रॅम सोन्याची माळ, आठ ग्रॅमची शंभर मण्यांची माळ, दोन ग्रॅमची कर्णफुले व रोख तीनशे रुपये पाकिटात ठेवण्यास सांगितले व ते पाकीट तरुणाने गावाबाहेर शेतातील रस्त्यावर नेऊन बळजबरीने माझ्याकडून काढून घेतले.

दुचाकीवरुन ढकलून देऊन खाली पाडले व निघून गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन कर्णेवाड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
farmer loan waiver scheme issue
Marathi News Esakal
www.esakal.com