मंगळवेढा : जुगार अड्ड्यावर धाड; प्राथमिक शिक्षकासह 9 जणांवर गुन्हा

या प्रकरणी 2 लाख 7 हजार 500 रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.
Crime
CrimeSakal
Updated on

मंगळवेढा : सकाळ वृत्तसेवा पाटबंधारे खात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेत जुगार खेळताना पोलीस खात्याने टाकलेल्या धाडीत जिल्हा परिषदेच्या शिक्षकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी 2 लाख 7 हजार 500 रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.

या प्रकरणाची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ माने यांनी दिली असून याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कचरेवाडी परिसरात दिलीप मेटकरी यांच्या घरासमोर असलेल्या पाटबंधारे खात्याच्या जागेत तीन पानी जुगार पैशावर खेळत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. असता सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला.

Crime
अखेर… तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे स्थलांतर

असता पाच ते सहा लोक अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मध्ये दिलीप रामचंद्र मेटकरी वय 64, दत्तात्रय श्रीमंत आवळेकर वय 42 ,दत्तात्रय अंकुश माने वय 34, सिताराम मोहन फटे वय 54, सर्वजण रा. कचरेवाडी असे मिळून आले तर पळून गेलेल्यामध्ये उमेश उत्तम गवळी रा.भालेवाडी, बबलू सिताराम शिंदे,लाला काळुंगे,महिपती अंकुश माने, पिंटू माने सर्व जण रा. कचरेवाडी त्यांच्या समोर जुगाराच्या पाने व रोख रक्कम 15 हजार 550 रुपये तसेच चार दुचाकी व तीन मोबाईल सह 2 लाख 7 हजार 500 रुपयांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतले.

आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कामगिरी पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल बामणे, पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे, पो.हे.काॅ महेश कोळी, पोलीस नाईक विठ्ठल कोळी, पो. कॉ. सोमनाथ माने, पो. कॉ.मलसिध्द कोळी, चालक समाधान यादव यांनी पार पाडली.तालुक्यातील अवैध धंद्यावर पदभार घेतल्यापासून पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी कारवाईचा धडाका लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com