

Elder Brother Killed in Solapur Younger Brother Appears Before Police After Alleged Family Dispute
esakal
सोलापूर : आईवर संशय घेऊन मोठा भाऊ तिला सतत शिवीगाळ करून मारहाण करीत होता. त्या रागातून रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास लहान भाऊ तानाजी देविदास माने (वय २१, रा. उमा नगरी, सोलापूर) याने मोठा भाऊ संभाजी (वय ३२) याच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून ठार मारले. खून केल्यानंतर अडीच तास विचार करून तो स्वत:च पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक करून घटनास्थळी धाव घेतली.