Solapur Dance Bar : ‘हररोज छमछम’ दोनशे कोटींची ‘माया’; बकाल सोलापूरचं पुन्हा अध:पतन!

‘हररोज छमछम’; पैशांचा पाऊस, ‘रात्र धुंदीत घालवा’ चा रंगारंग माहोल, देशोधडीला लागलेली तरुणाई, महिन्याची सर्व ऑर्केस्ट्रा बारची उलाढाल ही साधारण पावणेदोनशे ते दोनशे कोटींची आहे. हा आकडा थक्क करणारा आहे.
Solapur Dance Bar
Solapur Dance Barsakal

शिवाजीे भोसले : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - मादक सौंदर्याचं खुलेआम देहदर्शन... बीभत्स, हिडीस आणि अश्‍लील नृत्यांचा घायाळ करणारा जलवा... मद्याचे फेसाळणारे ग्लास... सिगारेटच्या धुरांचे पसरणारे लोट... पोटात रिचवलेलं मद्य अन् मादक सौंदर्याच्या ललनांचं आव्हान...

यातून जास्तच आलेली झिंग... खिशातून निघणारी नोटांची बंडलं... बारबालांवर पाडला जाणारा अक्षरश: नोटांचा पाऊस... जगाचा पडलेला विसर... ‘रात्र धुंदीत घालवा’ असाच रंगारंग माहोल... हे खरंखुरं चित्र आहे, सोलापूर शहर अन् जिल्ह्यात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालणाऱ्या बेकायदा डान्स बारमधलं.

दरम्यान, बकाल आणि उद्‌ध्वस्त सोलापुरात डान्स बारच्या नादाला लागलेली तरुणाई अक्षरश: देशोधडीला लागली. इथले डान्स बार सामाजिक चिंतेचा विषय बनले आहेत. डान्स बारमुळं या शहराचं अध:पतन होऊ लागलं आहे. औद्योगिकदृष्ट्या अत्यंत पिछाडीवर असलेल्या गिरणगाव सोलापुरात उद्योगधंद्यांअभावी एकीकडे तरुणाईच्या हाताला काम नाही.

रोजगार- धंद्यासाठी इथल्या तरुणांचे लोंढेच्या लोंढे मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळूर आदी ठिकाणी जाताहेत. या शहराच्या आर्थिक उत्पन्नाचा आलेख खूप खाली आहे. या शहरातलं एकूणच ‘सामाजिक स्वास्थ्य’ बिघडलंय. अशा स्थितीतच इथं धडाक्यात सुरू असलेले डान्स बार या शहराच्या अधोगतीला तसेच शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याला कारणीभूत ठरताहेत.

Solapur Dance Bar
Karnataka Election Result : कर्नाटकात शरद पवारांची NCP खातं उघडणार? निपाणीतून उत्तम पाटलांनी घेतली आघाडी

सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या हद्दीत हैदराबाद रोड, मार्केट यार्डपुढे; सोलापूर- पुणे राष्ट्रीय मार्गावर केगावनजीक; भारत पेट्रोल पंपाजवळ, हैदराबाद रोड; सोलापूर रेल्वे स्टेशननजीक; सोरेगाव परिसर, विजयपूर रोड; विजयपूर रोड हायवे; शिवाजीनगर, बाळे; खेडपाटी, बार्शी रोड; कोंडी परिसर; सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोंडी नजीक नान्नज,

ता. उत्तर सोलापूर; खेडपाटी, बार्शी रस्ता या ठिकाणी ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली कायद्याची उघडपणे पायमल्ली करीत डान्स बार धडाक्यात चालू आहेत. या संबंधित ठिकाणी केवळ ‘ऑर्केस्ट्रा बार’ अशा पाट्या झळकत असल्या तरी आतील चित्र मात्र पूर्णपणे वेगळं आहे.

केवळ नावाला ऑर्केस्ट्रा बार, बाकी सगळा नंगानाच डान्स बारमधला. इथं बारबालांची छमछम अव्याहत अन् बिनबोभाटपणे चालू असल्याचं खरंखुरं वास्तव आहे.

Solapur Dance Bar
Sharad Ponkshe: हिंदूत्वाचे विचार पोचवणं हेच राष्ट्रकार्य.. शरद पोंक्षे स्पष्टच बोलले

केवळ रात्र कसली; पहाटसुद्धा धुंदीतच...

सोलापूर शहर अन् ग्रामीण हद्दीत ज्या १२ ते १५ ऑर्केस्ट्रा बारना नियम अन् अटी घालून परवानगी देण्यात आलेली आहे, त्यामध्ये रात्री दीडपर्यंत केवळ गाण्यांच्या सादरीकरणामधून रसिकांची करमणूक व मनोरंजन करण्याला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखाली ऑर्केस्ट्रा बारची परवानगी देण्यात आलेली आहे.

एकाही बारला डान्स बारची परवानगी देण्यात आलेली नाही, तरीसुद्धा पहाटे पाचपर्यंत बिनधास्त अन्‌ बिनदिक्कतपणे डान्स बार चालविले जात आहेत. डान्स बारच्या दलदलीत बुडालेल्यांची केवळ रात्रच नव्हे, तर पहाटसुद्धा धुंदीत जातेय.

Solapur Dance Bar
Police Beating : बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यास अंजनावळेत मारहाण

दोनशे कोटींची ‘माया’; थक्क करणारी उलाढाल

सोलापूर शहर-जिल्ह्यात साधारण १५ डान्स बारमध्ये दररोज कमीत कमी सहा ते सात कोटींची ‘माया’ ओतली जाते. महिन्याची सर्व ऑर्केस्ट्रा बारची उलाढाल ही साधारण पावणेदोनशे ते दोनशे कोटींची आहे. हा आकडा थक्क करणारा आहे.

हा आकडा अनेकांना अतिशयोक्ती वाटू शकतो, पण सोलापूरच्या ‘छमछम विश्‍वातलं’ हे वास्तव आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील डान्स बारचा अभ्यास केल्यानंतर त्यामधून समोर आलेलं हे वस्तुनिष्ठ अन्‌ खरंखुरं चित्र आहे.

Solapur Dance Bar
Crime News : "तू कोणासोबत बोलत होतीस" अशी विचारणा करत जीमहून परतणाऱ्या तरुणीचा विनयभंग

सोलापुरी छमछम विश्‍वातल्या काही ठळक नोंदी...

  • मुख्यत्वे सोलापूर शहर- जिल्ह्यासह विदर्भ, मराठवाडा तसेच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील तरुणाईची पावलं डान्स बारमधील पाहुणचाराला

  • संगीतबारीला नाकारून तरुणाईकडून पहिली पसंती डान्स बारला

  • दिवसभर जुगार अन् रात्रीपासून पहाटेपर्यंत पुन्हा डान्स बार या नादानवृत्तीत तरुणाई लागली देशोधडीला

  • जुगार अन् मटक्यामध्ये मिळालेली ‘माया’देखील ओतली जातेय बारबालांवर

  • नशिली ‘रम’ अन्‌ मादक सौंदर्यानं घायाळ करणारी ‘रमा’ अशी डान्स बारमध्ये एकाच छताखाली सोय

  • साधारण २५ ते ४५ वयापर्यंतच्या आंबट शौकिनांचे पाय वळताहेत डान्स बारकडे

  • बकाल अन्‌ उद्ध्वस्त सोलापुरातलं कोट्यवधी रुपयांचं चलन जातंय अन्यत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com