

मंगळवेढा - 21 सकाळ वृत्तसेवा केवळ बातमी पुरते वर्तमानपत्र असते ही भावना समाजमनाची असते मात्र दैनिक सकाळ ने त्याच्या पलीकडे जाऊन देसाई ब्रदर्स प्रा. लि. च्या माध्यमातून तालुक्यातील सिमावर्ती भागातील सोड्डी येथे जलसंधारणाचे काम हाती घेतले.
दैनिक सकाळ व देसाई प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून आज या कामाचा शुभारंभ पोलीस निरीक्षक रणजीत माने निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे,वितरण प्रमुख राम गावडे,प्राचार्य बसवराज कोरे, माजी सरपंच शांतापा बिराजदार,महादेव बिराजदार,सिद्राया बिराजदार उपसरपंच शिवाप्पा नरोटे, बाळाप्पा कमते, ग्रामसेवक ईन्नुस फुलारी, यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत या गावाने शेतीच्या व पिण्याच्या पाणी प्रश्नावरून बहिष्कार टाकून पाण्याची भावना राज्य सरकारला दाखवण्याचा प्रयत्न केला सीमावर्ती भागातील हे गाव असल्यामुळे अनेक विकासाच्या योजनेसाठी गावकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते.
मात्र दैनिक सकाळने गेल्या अनेक वर्षापासून सुरू केलेल्या सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामासाठी यापूर्वी सलगर बुद्रुक, आसबेवाडी, जंगलगी, जित्ती, मरवडे या ठिकाणी उल्लेखनीय काम केल्यानंतर यंदा रोजगाराचे साधन नसल्यामुळे 70 टक्के होऊन अधिक लोक ऊसतोडणीच्या निमित्ताने स्थलांतरित होतात.
या भागातील जलसंधारणाच्या कामामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. निवासी संपादक अभय दिवाणजी यांनी सकाळ बद्दलची भूमिका विशद केली प्रास्ताविक तनिष्का प्रमुख रजनीश जोशी यांनी केले,सकाळचे बातमीदार हुकूम मुलाणी, दावल इनामदार, श्रीकांत मेलगे, महेश पाटील उपस्थित होते.
सकाळ रिलीफ फंड व देसाई ब्रदर्स लि.च्या माध्यमातून गाळ काढण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. तलाव, बंधारा या ठिकाणी वर्षानुवर्ष साचलेला गाळ काढल्यास साठवण क्षमतेच वाढ झाल्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी वाढणार आहे. सकाळच्या माध्यमातून होत असलेल्या या उपक्रमास प्रशासनाच्या वतीने आपले नेहमी सहकार्य राहील.
चंद्रकांत हेडगिरे,निवासी नायब तहसीलदार
तलाव, बंधारे येथील गाळ काढण्याचे काम सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून होत असले तरी ते काम मोठ्या प्रमाणात होण्यासाठी लोकसहभाग ही तेवढाच महत्वाचा असतो.जलसंधारणाच्या कामामुळे आपल्याच गावाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे त्यामुळे या कामात लोकसहभाग नोंदविणे आवश्यक आहे.
रणजित माने,पोलीस निरीक्षक
दैनिक सकाळ व देसाई ब्रदर्स प्रा.लि.ने दुष्काळी परिस्थितीचा विचार करून सोड्डी ची केलेली निवड ही सार्थ असून त्यामुळे सकाळ बरोबर लोकांचा सहभाग वाढून हे काम प्रेरणादायी ठरेल.
बसवराज कोरे प्राचार्य एम.पी. मानसिंगका विद्यालय
सीमावर्ती भागात कोणतीही शासकीय योजना राबवण्यासाठी विलंब होतो मात्र सकाळ व देसाई ब्रदर्स प्रा. लि. ने सीमावर्ती भागात जलसंधारणाच्या कामासाठी पुढाकार घेतलाह त्यामध्ये आम्ही निश्चित लोकसहभाग दाखवू शांताप्पा बिराजदार माजी सरपंच सोड्डी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.