सोलापूर - विवाहाच्या आमिषातून सव्वालाखाची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवाहाचे आमिष दाखवून सव्वालाखाची फसवणूक.

सोलापूर - विवाहाच्या आमिषातून सव्वालाखाची फसवणूक

सोलापूर - भारत मेट्रीमोनीचा आयडीधारक संजय के (३२४२९१०) संजय सुनकी याने विवाहाचे आमिष दाखवून एक लाख ३२ हजार ३०० रुपयांस फसविल्याची तक्रार भवानी पेठेतील श्रीशैल नगरात राहणाऱ्या वंदना कल्याणराव मोनी यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली. घटनेची हकीकत अशी, शादी डॉट कॉमच्या धर्तीवरच अविवाहितांसाठी मेट्रीमोनी हे संकेतस्थळ आहे. त्यावर १० एप्रिल २०२२ रोजी वंदना मोनी यांची ओळख त्या समोरील व्यक्तीबरोबर झाली. मोनी या ३६ वर्षीय असून त्यांनी संजय सुनकी याला विवाहाबद्दल विचारल्यानंतर त्याने होकार दिला. त्यानंतर संजयने वंदना यांच्याकडे महागड्या भेटवस्तूची मागणी केली.

त्याने तब्बल एक लाख ३२ हजार ३०० रुपये किमतीचे घड्याळ खरेदी केले आणि त्याचे पैसे वंदना यांच्याकडून घेतले. ते पैसे वंदना यांनी गूगल-पेद्वारे पाठविले. काही दिवसांच्या ओळखीतच महागडी वस्तू मिळाल्याने संजय हा वंदना यांच्याकडे पुन्हा पैशांची मागणी करू लागला. समोरील व्यक्ती फसवी असल्याची खात्री पटताच वंदना यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ओळख होऊन १२ दिवसच झाले होते, तेवढ्यात वंदना यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

सायबरच्या मदतीने होणार तपास

भारत मेट्रोमनी या विवाहाच्या संकेतस्थळावरून संजय सुनकी नावाच्या व्यक्तीने वंदना कोनी यांची फसवणूक केली आहे. एक लाख ३२ हजार ३०० रुपये त्याने गूगल-पेद्वारे घेतले होते. त्यामुळे सायबर क्राईमअंतर्गतही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या फसवणुकीचा सखोल तपास करण्यासाठी सायबर सेलची देखील मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती तपास अधिकारी तथा जोडभावी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी दिली.

Web Title: Solapur Deception Of 125 Lakh From Lure Of Marriage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top