सोलापूर : श्री सिध्देश्‍वर यात्रेच्या परवानगीचा आज निर्णय

महापालिका आयुक्‍तांची संपणार सुट्टी
श्री सिध्देश्‍वर
श्री सिध्देश्‍वर sakal
Updated on

सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्देश्‍वरांच्या (shri siddheshwar) यात्रेस काही दिवसांचा अवधी उललेला असतानाही अजून महापालिका आयुक्‍तांनी(comissionor of carporation) त्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेतलेला नाही. आयुक्‍त सुट्टीवर असल्याने प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर(collector milind shambharkar) व महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त विजय खोराटे यांनीही मंदिर समितीच्या निवेदनावर निर्णय घेतला नाही. आता उद्या (सोमवारी) महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर(p. shivshankar) हे कामावर रुजू होतील. त्यावर अंतिम निर्णय होऊ शकतो, अशी माहिती खोराटे यांनी दिली.

कोरोनातील निर्बंधांमुळे मागील दोन वर्षांपासून ग्रामदैवत श्री सिध्देश्‍वरांची यात्रा भरु शकली नाही. आता निर्बंध शिथिल केल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत. विवाहावरील निर्बंधही उठविले असून सार्वजनिक ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम होत आहेत.

श्री सिध्देश्‍वर
सावधान : 'ऑनलाईन गेम्स'मुळे मुलांचे आयुष्य धोक्यात

अनेक ठिकाणी यात्रादेखील होऊ लागल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर ग्रामदैवत श्री सिध्देश्‍वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी देवस्थान पंच कमिटीने महापालिकेकडे केली आहे. ७ डिसेंबरला निवेदन देऊनही त्यावर अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही. दरम्यान, नॉर्थकोट मैदानावरील क्रेडाईला परवानगी दिल्याने होम मैदानासह मंदिर परिसरात छोट्या व्यावसायिकांचे स्टॉल लावण्यास परवानगी मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. परंतु, त्यावर सोमवारी निर्णय होऊ शकतो.

९०० वर्षांची परंपरा

ग्रामदैवत श्री शिवयोगी सिध्देश्‍वर महाराजांच्या यात्रेला नऊशे वर्षांची परंपरा आहे. त्यात ब्रिटिश कालखंडातही खंड पडला नाही. परंतु, कोरोनामुळे मागील दोन वर्षांत यात्रा साधेपणाने साजरी करावी लागली. आता कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला असून प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे यात्रेला परवानगी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १२ ते १६ जानेवारी या कालावधीत यात्रा होणार आहे.

श्री सिध्देश्‍वर
सोलापूर : मोबाईल गेम्स खेळताना सावधान !

ग्रामदैवत श्री सिध्देश्‍वर महाराजांच्या यात्रेला परवानगी देण्यासंदर्भात अजून कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. महापालिका आयुक्‍त कामावर रुजू झाल्यानंतर त्यावर निर्णय होईल.

- विजय खोराटे, अतिरिक्‍त आयुक्‍त, सोलापूर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com