गणपती मंदिरात तोडफोड; ग्रामस्थांच्या इशाऱ्यानंतर वादात जिल्हाधिकाऱ्यांची उडी

Ganesh Mandir
Ganesh MandirSakal
Updated on

सोलापूर : सोलापूरातील मंगळवेढा येथील माचणूर येथे असलेल्या गणपती मंदिरातील फरश्यांची तोडफोड पुरातत्व विभागाकडून करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत मंदिर बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे या वादावर तोडगा निघाला असून दोन दिवसांत मंदिराचं काम करण्याचं आश्वासन दिलं आहे.

दरम्यान, माचणूर येथील पुरातन गणपती मंदिराची देखभाल पुरातत्व विभागाकडे आहे. या मंदिरात ग्रामस्थांनी केलेल्या फरशीकामावर पुरातत्व विभागाने आक्षेप घेत तोडफोड केली होती. त्यानंतर ग्रामस्थांच्या भावना दुखावल्यामुळे हा वाद पेटला होता. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. त्यानंतर या वादात सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्याने मध्यस्थी केली आहे.

Ganesh Mandir
पुणे महानगरपालिकेचे दोन भाग होणे गरजेचे; चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

पुरातत्व विभागाकडे या मंदिराची डागडुजी करण्यासाठी अनेक वेळा ग्रामस्थांनी मागणी केली पण पुरातत्व विभागाने ग्रामस्थांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी वैतागून स्वखर्चाने मंदिरात फरश्या बसवल्या. ग्रामस्थांनी केलेल्या कामावर पुरातत्व खात्याने आक्षेप घेत भर गणेशोत्सवाच्या काळात या मंदिरातील फरशी कामाची तोडफोड केली. त्यानंतर हा वाद पेटला होता.

Ganesh Mandir
Nashik Flood: नाशिकला पावसाने झोडपले; गोदावरीला पूर

हा वाद पेटल्यानंतर पुरातत्व खात्याने मंदिराच्या फरशी कामाचे आश्वासन दिले पण ग्रामस्थांचा संताप अनावर होत त्यांनी हे मंदिर बंद ठेवण्याचा इशारा दिला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत दोन दिवसांत हे बांधकाम केले जाणार असल्याचं आश्वासन देत या वादावर तोडगा काढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ladki Bahin Yojana
The meeting focused on rural infrastructure, water supply, healthcare, education, sanitation and effective implementation of government schemes.
The initiative, inspired by the Haritwari concept, also included tree plantation and traffic awareness activities on the Sant Gajanan Maharaj Palkhi route in Solapur district.
Power Cut
Marathi News Esakal
www.esakal.com