
Solapur Dengue Outbreak
Sakal
Solapur: शहर व जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. नदी व नाल्यांचे पूर ओसरले. पूर कालावधीत आलेला गाळ व घाण घरांमध्ये व रस्त्यावर साचून राहिला. गाळांनी भरलेली घरे व रस्ते दुर्गंधीने माखले गेले. या घाणीतून होणाऱ्या साथीच्या आजाराची भीती नागरिकांमध्ये वाढली आहे. सध्या डेंगी, टायफॉईड आणि अतिसाराचे आजार वाढण्याची शक्यता आहे. शहरात २६ डेंगीचे रुग्ण तर टायफॉईड सदृश आठ रुग्ण विविध दवाखान्यांमध्ये दाखल झाले आहेत.