Solapur News: आचारसंहितेचा सोलापूरच्या विकासकामांना ब्रेक; १,४८३ कोटींचा पाणीप्रकल्प, उड्डाणपूल अन् भरती रखडणार

Solapur Water Project And Flyovers Face Delay: आचारसंहितेमुळे सोलापूरच्या २,५०७ कोटींच्या विकास आराखड्याला दीड महिन्याची अडथळा; पाणीपुरवठा प्रकल्प, उड्डाणपूल, बीओटी योजना व भरती प्रक्रिया थांबल्या
Solapur Development Work Hit By Election Code Of Conduct With 1483 Crore Water Project And 1024 Crore Flyovers Delayed

Solapur Development Work Hit By Election Code Of Conduct With 1483 Crore Water Project And 1024 Crore Flyovers Delayed

sakal

Updated on

सोलापूर : केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या पाच पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे २७ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणाऱ्या आचारसंहितेमुळे शहरातील महत्त्वाच्या विकासकामांना दीड महिन्याचा ब्रेक लागला आहे. शहरातील १ हजार ४८३ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पाची निविदा प्रक्रिया, १ हजार २४ कोटी रुपयांच्या दोन उड्डाणपुलांच्या कामांचे कार्यादेश, १५७ पदांची भरती, २४९ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची प्रक्रिया आणि बाळीवेस येथील बीओटी प्रकल्पाचा निर्णय लांबणीवर पडणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com