

Solapur DCC Bank Election
esakal
Solapur Cooperative Bank Election : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने आता राजकीय वातावरण तापले असून, दोन्ही पॅनलकडून प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपने सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला. निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होऊ नये, यासाठी भाजपकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. तर दुसरीकडे मोहिते-पाटील पॅनलकडून स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.