District Bank Election; सोलापूर जिल्हा बँक निवडणूक दुष्काळ संपेपर्यंत पुढे ढकला; 'रयत क्रांती'ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

Solapur District Bank Election, Drought, Rayat Kranti Demand — सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याने जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी रयत क्रांती संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
Solapur District Bank Election, Drought, Rayat Kranti Demand

Solapur District Bank Election, Drought, Rayat Kranti Demand

esakal

Updated on: 

सोलापूर,:महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले असून जिल्ह्यात सरासरी ५७ टक्के पावसाची मोठी तूट आहे . ग्रामीण जनता आणि शेतकरी सध्या पिकांचे नुकसान, पाण्याचे दुर्भिक्ष आणि जनावरांच्या चाऱ्याच्या चिंतेमुळे जगण्याचा मोठा संघर्ष करत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन सध्या दुष्काळ निवारण, टँकर पुरवठा आणि पंचनाम्यांमध्ये व्यस्त असताना, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक घेणे अत्यंत अयोग्य ठरेल. त्यामुळे ही निवडणूक परिस्थिती सुधारेपर्यंत तातडीने पुढे ढकलावी, अशी आग्रही मागणी रयत क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष नामदेव यशवंत पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com