

Solapur Bank Election Update Six Former Directors Challenge High Court Verdict in Supreme Court Over Nomination Disqualification
sakal
सोलापूर : उमेदवारी अर्ज अपात्र ठरलेल्या सहा माजी संचालकांनी दाखल केलेल्या याचिकांमध्ये कोणतेही तथ्य किंवा मेरिट आढळले नसल्याने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने या याचिका आज फेटाळल्या आहेत. आता माजी संचालकांनी विशेष अनुमती याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘या याचिकेवर तातडीची सुनावणी घ्यावी’, अशी विनंती करण्यासाठी उद्या (मंगळवार, ता. १७) याचिकाकर्त्यांचे वकील सरन्यायाधीशांना भेटणार आहेत.