Solapur News : जिल्ह्यात पतसंस्थांच्या व्यवसायाला मोठी संधी

फेडरेशन राज्याध्यक्ष कोयटे; सहकार मंत्र्यांसोबत आज बैठक Solapur District Big opportunity for the business of credit institutions in the district
Cooperative Credit Institutions
Cooperative Credit Institutionssakal

सोलापूर - सोलापूर जिल्ह्याला सहकाराचा समृद्ध वारसा आहे. तरी देखील जिल्ह्यात पतसंस्थांची चळवळ वाढली नाही, या कारणांचा आम्ही शोध घेत आहोत. जिल्ह्यात पतसंस्था वाढल्या परंतु पतसंस्थांचा व्यवसाय वाढला नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी दिली.

Cooperative Credit Institutions
Solapur : मणिपूर घटनेतील दोषीवर कारवाई करा मोहोळ 'अंनिस'ची मागणी

पंढरपुरात २६ व २७ ऑगस्टला पतसंस्थांसाठी राज्यस्तरीय सहकार परिषद होणार आहे. या परिषदेचा आढावा घेण्यासाठी अध्यक्ष कोयटे सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Cooperative Credit Institutions
Solapur Airport : विमानतळाच्या लायसनसाठी लागणार 'इतक्या' महिन्यांचा कालावधी; DGC कडून परवानगी आवश्यक, 50 कोटींची गरज

याप्रसंगी सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे, राज्य फेडरेशनचे संचालक वासुदेव काळे व भास्कर बांगर, जिल्हा फेडरेशनचे सचिव मल्लिकार्जुन केंदुळे, उपाध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी, सचिव रंगनाथ गुरव उपस्थित होते. अध्यक्ष कोयटे म्हणाले, सहकारी पतसंस्थांसाठी राज्य सरकार म्हणावे तेवढे लक्ष देत नाही. पतसंस्थांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत १७५ पतसंस्थांचे तीनशे कोटी रुपये अडकले आहेत.

Cooperative Credit Institutions
Solapur : शहरातील उड्डाणपुलांसाठी एक लाख सह्यांची मोहीम

पतसंस्थांची थकलेली कर्ज वसूल करण्यासाठी १०१ च्या प्रकरणाचे दाखले लवकर मिळत नाहीत यासह कर्ज वसुली प्रक्रिया वेळखाऊ व किचकट आहे. ही प्रक्रिया सुलभ व्हावी, पतसंस्थांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी फेडरेशनच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत उद्या (शनिवार, ता. ५) पुण्यात पतसंस्था फेडरेशनची बैठक होणार आहे. या बैठकीत आम्ही आमचे प्रश्न मांडणार असून एक महिन्यात हे प्रश्न न सुटल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही अध्यक्ष कोयटे यांनी दिला आहे.

Cooperative Credit Institutions
Solapur : 'तत्कालीन' तहसीलदाराच्या नावे लाच मागणाऱ्याला अटक; मोहोळ येथे लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई

सोनेतारणमध्ये पतसंस्थांना मोठी संधी

मालमत्ता तारण ठेवून त्यावर कर्ज दिल्यास पतसंस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. थकीत कर्जाची वसुली होत नाही, वसुली झाली तर ताबा मिळत नाही, ताबा मिळाला तर विक्री होत नाही. त्यापेक्षा सोने तारण ठेवून कर्ज दिल्यास पतसंस्थांना सुरक्षित व्यवसाय करण्याची संधी आहे. सोने तारण कर्जामध्ये बाहेरच्या राज्यातील अनेक कंपन्या येऊन मोठा व्यवसाय करत आहेत. आम्हीही या व्यवसायात व्यापक पातळीवर पदार्पण करणार असल्याचे अध्यक्ष कोयटे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com