Education News : साेलापूर जिल्ह्यात सुरू होणार आणखी चार लॉ कॉलेज: उच्च शिक्षण विभागाकडून मान्यता

Solapur News : आता बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे मान्यतेसाठी या महाविद्यालयांचे प्रस्ताव गेले आहेत. त्यांच्याकडून काही दिवसांत मान्यता अपेक्षित असून आगामी शैक्षणिक वर्षापासून या नव्या चार महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना वकिलीचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
Education News
Education NewsSakal
Updated on

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित चार लॉ महाविद्यालयांना राज्याच्या उच्च शिक्षण विभागाकडून मंजुरी मिळाली असून विद्यापीठाचीही त्यांना मान्यता मिळाली आहे. आता बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे मान्यतेसाठी या महाविद्यालयांचे प्रस्ताव गेले आहेत. त्यांच्याकडून काही दिवसांत मान्यता अपेक्षित असून आगामी शैक्षणिक वर्षापासून या नव्या चार महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना वकिलीचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com