
सकाळ वृत्तसेवा
टेंभुर्णी: सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख यांनी वाढदिवसानिमित्त भेटवस्तू नको, गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या आणा’, असे आवाहन कार्यकर्ते व हितचिंतकांना केले. त्यांच्या या आवाहनाला संबंध जिल्हाभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला असून वाढदिवसानिमित्त तब्बल वीस हजारांहून अधिक वह्या संकलित झाल्या आहेत. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून आता जमा झालेल्या या वह्यांचे त्यांचे बंधू रावसाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त माढा तालुक्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जाणार आहे.