
Solapur Teacher Certificate verification: यंदा जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी संवर्ग एकमधून अर्ज दाखल केलेल्या दिव्यांग व दुर्धर आजारी शिक्षकांना मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलकडून वैद्यकीय प्रमाणपत्राची फेरतपासणी करून घ्यावी लागणार आहे. सोमवारी (ता. २१) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी तसा आदेश काढला आहे. दरम्यान, याबाबत बार्शी तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने आंदोलनाचा इशारा दिला होता.