esakal | कोरोना : गाव बंदचा फटका अत्यावश्‍यक सेवेलाच
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur district there are emergency service not available for time

कोरोना रोगाचा वाढता प्रभाव लक्षात घेता महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात सर्वप्रथम खबरदारी घेऊन 144 कलम लागू करण्यात आले त्यामुळे ग्रामीण भागातील नवीन वर्षाच्या मुहूर्तावर होणाऱ्या यात्रेची परंपरा खंडित झाली.

कोरोना : गाव बंदचा फटका अत्यावश्‍यक सेवेलाच

sakal_logo
By
हुकुम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : जगभरात धसका घेतलेल्या कोरोना रोगाचा लोण आता ग्रामीण भागात न येण्याचा धसका नागरिकांनी सुद्धा घेतला. या धसक्याने सध्या ग्रामीण भागात इतर ठिकाणचा वाढता लोंढा लक्षात घेऊन तळसंगी ग्रामस्थाने गाव बंद करत रस्त्यावर काटे टाकले. याचा फटका मात्र या मार्गावरून अत्यावश्यक सेवेसाठी जाणायऱ्या शासकीय नोकराना बसला.
कोरोना रोगाचा वाढता प्रभाव लक्षात घेता महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात सर्वप्रथम खबरदारी घेऊन 144 कलम लागू करण्यात आले त्यामुळे ग्रामीण भागातील नवीन वर्षाच्या मुहूर्तावर होणाऱ्या यात्रेची परंपरा खंडित झाली. मंगळवेढ्यात देखील त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली यामध्ये उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले , उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील, तहसीलदार स्वप्निल रावडे, पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवून परिस्थिती आटोक्यात ठेवल्यावर लक्ष ठेवले. शहर व ग्रामीण भागात जवळ बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली. पोलिसांनी रिकाम टेकड्यांना लाठीचा प्रसाद देत यावर नियंत्रण ठेवले अशा परिस्थितीत ग्रामीण भागात देखील याचा धसका मोठ्या प्रमाणात घेतला असून पंढरपूर- विजापूर महामार्ग पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तळसंगी येथील ग्रामस्थांनी याचा धसका घेत मंगळवेढा मरवडे रोडवरील भालेवाडी फाट्याजवळ रस्त्यावर काटे टाकत येणाऱ्याला गाव बंद केले. त्यामुळे महावितरण, दुध, बॅक या अत्यावश्यक सेवेसाठी या मंगळवेढा ते निंबोणी हा रस्ता खराब असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या सोलापूरवरून येणाय्रा शासकीय नोकरदारांना मात्र याचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना पर्यायी मार्गाने मरवडे मार्गे दुरवरून जाण्याची वेळ आली. या प्रकाराने गावातील अचानक आजारी पडल्यावर देखील एखाद्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा सिमा बंद करण्याच्या तोंडी सुचना
कोरोना संसर्गजन्य असल्याने या रोगाशी संशयित गावात येवू नये आणि गावातील बाहेर जावू नये यांच्या  खबरदारीच्या सुचना गाव समितीला दिल्या आहेत. जिल्हा सिमा बंद करण्याच्या तोंडी सुचना दिल्या.
दत्तात्रय पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी

loading image