
Solapur District Upalai Budruk : लहरी वातावरणामुळे शेती उद्योग तितकासा फायदेशीर ठरत नसल्याने, युवक वर्ग शेतीपासून दुरावत असताना उपळाई बुद्रूक (ता.माढा) येथील युवकांना 'गांडूळ खत' निर्मितीतून रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याने, शेतीची आवड देखील निर्माण झाली असून, येथील अनेक युवा शेतकऱ्यांनी गांडूळ खतनिर्मितीतून उंच भरारी घेतली आहे. त्यामुळे 'अधिकाऱ्यांच्या गावाची, गांडूळ खतनिर्मिती उद्योजकांचे गाव' अशी वेगळी ओळखही निर्माण होत आहे.