Solapur Division of Central Railway : रेल्वे विभागीय व्यवस्थापकांकडून कुर्डुवाडी, लातूर सेक्शनची पाहणी

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे रेल्वे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे यांनी आज कुर्डुवाडी व लातूर सेक्शनची पाहणी केली.
Solapur Division of Central Railway
Solapur Division of Central Railway sakal
Updated on

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे रेल्वे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे यांनी आज कुर्डुवाडी व लातूर सेक्शनची पाहणी केली. सोलापूर विभागाला मिळालेल्या नवीन परख निरीक्षण व्हॅनचे उद्‍घाटनही त्यांनी केले. सोलापूर, कुर्डुवाडी सेक्शनच्या विंडो ट्रेलिंगचीही त्यांनी पाहणी केली.

कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर अमृत स्टेशन योजनेतून सुरू असलेल्या कामाची पाहणी त्यांनी केली आणि रेल्वे लाईनचे निरीक्षण केले. कुर्डुवाडी - लातूर सेक्शनचे निरीक्षणच्या वेळी, सेक्शन मधील सर्व रोड अंडर ब्रिजची पाहणी केली.

लातूर रेल्वे स्थानकावर ‘अमृत स्टेशन योजना’ अंतर्गत कामाची पाहणी केली आणि नवीन पीट लाइनचे भूमिपूजन केले. यावेळी वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) चंद्रभूषण, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक जे. एन. गुप्ता, विभागीय अभियंता (मध्य) रवींद्र सिंगल, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (टिआरडी) अनुभव वार्ष्णेय, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (जनरल) अभिषेक चौधरी, वरिष्ठ विभागीय यांत्रिकी श्री. प्यासे या प्रमुख अधिकाऱ्यांच्या समवेत अन्य रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.