
Solapur Startup News: पदव्युत्तर शिक्षण असूनही सोलापूरमध्ये १० हजार रुपयांपेक्षा जास्त पगार मिळत नाही. त्यामुळे दिव्या हरिदास पेंटा यांनी नोकरी शोधण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. दिव्या यांनी फेब्रुवारी महिन्यात सोलापूरमधील मार्कंडेय रुग्णालयासमोर उसाच्या रसाचा व्यवसाय सुरू केला. विशेष म्हणजे उसाच्या रसाचे चविष्ट आईस्क्रीम बनवण्यात तांचा हातखंडा आहे.