
Solapur Police Action: डीजेसमोर बसवून ठेवल्याने एकास बहिरेपणा आल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याची पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन याचा तपास हेडकॉन्स्टेबल दीपक उपासे यांच्याकडून काढून सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वरांजली खमितकर यांच्याकडे सोपविला आहे. तर डॉल्बीवर कारवाईसाठी गुन्हे प्रकटीकरण पथक साताऱ्याला रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे.