Solapur Elevated Corridor: सोलापूरकरांसाठी मोठी बातमी! जुना पूना नाका ते बोरामणी नाका उन्नत मार्गिकेला प्रकल्पाला गती, मंत्रिमंडळाची मंजुरी

Solapur Elevated Corridor Gets Cabinet Approval: जुना पूना नाका–बोरामणी नाका उन्नत मार्गिका ‘निकडीचा सार्वजनिक प्रकल्प’ घोषित; मंत्रिमंडळाच्या मंजुरीमुळे शासकीय जमीन एनएचएआयकडे विनाभोगवटा हस्तांतरणाचा मार्ग मोकळा
Solapur Elevated Road Project Gets Green Signal Cabinet Approves Juna Puna Naka to Boramani Naka Four Lane Corridor

Solapur Elevated Road Project Gets Green Signal Cabinet Approves Juna Puna Naka to Boramani Naka Four Lane Corridor

sakal

Updated on

सोलापूर : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या जुना पूना नाका ते बोरामणी नाका (उड्डाणपूल) चारपदरी उन्नत मार्गिका प्रकल्पाला गती मिळाली आहे. या प्रकल्पाला ‘निकडीचा सार्वजनिक प्रकल्प’ म्हणून घोषित करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जमीन कोणतेही भोगवटा मूल्य न आकारता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचएआय) हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com