
सोलापूर : सोलापूर शहर व परिसराच्या तापमानात आज कमालीची घट बघायला मिळाली. मंगळवारी सोलापुरात ४०.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. मंगळवारच्या तुलनेत आज सोलापूरच्या तापमानात २.१ अंश सेल्सिअसची घट झाली. आज सोलापुरात ३८ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. ढगाळ वातावरणामुळे आज सोलापुरात नेहमीपेक्षा उन्हाचा चटका कमी होता.