solapur : वीज कनेक्शन तोडण्याचा बनावट मेसेज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSCB  Electricity

Solapur : वीज कनेक्शन तोडण्याचा बनावट मेसेज

सोलापूर : वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट ‘एसएमएस’ पाठवून वीज बिल अपडेट करायला सांगितले जात आहे. बोगस लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करायला सांगून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होऊ लागले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून आलेल्या ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.

मागील काही दिवसांपासून विविध ग्राहकांना बनावट एसएमएस पाठवून लुबाडण्याचे प्रकार होत आहेत. नुकतेच काही ठिकाणी बनावट ‘एसएमएस’ पाठवून ऑनलान फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

त्यासाठी ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा’, असा मजकूर त्या बनावट मेसेजमध्ये नागरिकांना पाठविला जातो. पण, महावितरणकडून कोणालाही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून असे ‘एसएमएस’ व व्हॉट्सअॅप मेसेज पाठविले जात नाहीत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

तक्रारी असल्यास हेल्पलाइनवर संपर्क साधा

महावितरणकडून मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच ‘एसएमएस’द्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वत:हून मीटर रिडींग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस ही माहिती पाठविली जाते.

बनावट मेसेजला बळी न पडता ग्राहकांनी काही शंका व तक्रारी असल्यास १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच बनावट मेसेज आल्यास ग्राहकांनी cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

Web Title: Solapur Fake Message Disconnection Power Connection Personal Mobile Number Messages

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..