Solapur : ऊस दरासाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Farmers agitation for sugarcane price

Solapur : ऊस दरासाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

मंगळवेढा : उसाला पहिली उचल 2500 रु. व अंतिम बिल 3100 रुपये देण्याबाबतचा निर्णय जाहीर करावा. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नागपूर रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील माचणूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यामुळे या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था बराच वेळ विस्कळीत झाली.

राज्यात उस गाळप हंगाम सुरू होऊन तीन आठवडे उलटले तरी सोलापूर जिल्ह्यातील कारखाने मात्र अद्याप पूर्ण क्षमतने सुरू झाले नाहीत जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्र येत उस संघर्ष समिती स्थापन केली असून समितीने आठवड्यापूर्वी पंढरपुरमध्ये उस परिषद घेऊन जिल्ह्यातील उसाला पहिली उचल 2500 तर अंतिम दर 3100 रूपये मागणी केली असून अद्याप एका ही कारखान्याने उस दर जाहीर केला नसुन जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाल्या.

तालुक्यामध्ये सिद्धापूर अरळी नंदुर तांडोर या ग्रामपचायतीतर्फे ऊस दर जाहीर करण्याबाबत ग्रामपंचायत ठराव करत उस दर जाहीर होपर्यंत उसतोड व उस वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमानीचे पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडीचे अध्यक्ष ॲड. राहुल घुले म्हणाले की, पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून ऊस उत्पादकांनी एकत्र येण्याचे गरज आहे.

गेली दोन वर्ष कोरोना असल्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले नाही. त्यामुळे कारखानदारांनी सांगली कोल्हापूर पेक्षा एक हजार रुपये ऊस दर कमी दिला. पण यंदा तुमच्या उसाला पहिली उचल 2500 तर अंतिम दर 3100 रूपये घेऊ फक्त शेतकऱ्यांनी पक्ष, पार्टी, गट बाजुला ठेवून ऊस दर जाहीर झाल्याशिवाय आपल्या ऊसाला तोड लावू नका.

जिल्हा संघटक युवराज घुले म्हणाले की दहा वर्षांपूर्वी दिलेल्या दरापेक्षा यंदा कमी दर मिळून देखील शेतकरी गप बसतात अल्पभूधारक शेतकरी ऊसदराच्या आंदोलनात रस्त्यावर येतात आणि सर्वाधिक ऊस पिकवणारे शेतकरी कारखानदाराच्या बाजूला जाऊन बसतात ही खरी शोकांतिका आहे. अनिल बिराजदार म्हणाले की कोल्हापूरचे शेतकय्रांनी

कोल्हापुरी पायतान हातात घेतल्यामुळे सर्वाधिक दर पदरात पाडून घेतात मात्र सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सोलापुरी सादर प्रांघरून घरात बसल्याने कमी दर घेतात त्यामुळे ही तफावत दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार,रामचंद्र सारवडे,राजकुमार स्वामी,मल्लिकार्जुन भांजे,सचिन चौगुले,अमोगसिध्द काकणकी,रवि गोवे,रवि पुजारी,विकास पुजारी,सज्जन पाटील, गणेश गावकरे, शंकर संग शेट्टी आबा खांडेकर, शांताप्प कुंभार व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी कडे पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.