Solapur : केलेल्या कामाच्या जोरावरच पुन्हा मत मागण्यास जावू आ.आवताडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur

Solapur : केलेल्या कामाच्या जोरावरच पुन्हा मत मागण्यास जावू आ.आवताडे

मंगळवेढा : तालुक्यातील प्रश्‍न सोडवण्यासाठी शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे केली हे सर्व प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार असून मतासाठी राजकारण करणारा मी नसून केलेल्या कामाच्या जोरावरच पुन्हा मत मागण्यास जावू असा विश्‍वास आ समाधान आवताडे यांनी ग्रामीण भागाच्या दौय्रात भाळवणी येथे बोलताना दिला .

यावेळी माजी सभापती प्रदीप खांडेकर,धनाजी काटकर,महादेव साखरे,दामाजी शिंदे,चारु पाटील,महादेव लोखंडे,पंडीत माने,श्रीरंग माने,तानाजी पाटील,विश्‍वंभर मोरे रामचंद्र निळे आदी उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांनी संवाद साधताना आ आवताडे म्हणाले की परतीच्या पावसाने तालुक्यातील नुकसान झालेल्या सर्व पिकाचे पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या.

त्याबाबतची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील केले आहे मात्र हुलजंती यात्रा व उपमुख्यमंत्रीचा दौरा यामुळे विलंब झाला असला तरी लवकरच सरसकट नुकसानीचे पंचनामे करुन मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून मंगळवेढा उपसा सिंचन योजना बसवेश्‍वर व चोखोबा स्मारक या प्रलंबित प्रश्‍नावर राजकारण झाले  असून मी राजकारण करणारा नसून हे प्रश्‍न मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.

अनेक गावातील रस्त्याच्या कामासाठी निधी मिळवला असून ही कामेदेखील लवकरच सुरु होतील असा विश्‍वास देत तालुक्यातील प्रमुख प्रश्‍न एकही प्रलंबित ठेवणार नाही सर्व प्रश्‍न मार्गी लावूनच जनतेसमोर जाणार असल्याचे सांगीतले यावेळी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र निळे यांनी हिवरगाव भाळवणी रस्त्यासाठी चार सरपंच होवून गेले तरी रस्ता डांबरी झाला नाही या रस्त्याचे त्वरीत डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी केली तर मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या तालुकाउपाध्यक्षपदी परमेश्‍वर साळुंखे यांची निवड झाल्याबददल आ समाधान आवताडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना साळुंखे यांनी ही एखादा प्रश्‍न राहू दया पण पाणीप्रश्‍न अगोदर सोडवा अशी मागणी केली.