
सन 2023/24 सालात भरलेल्या पिक विम्याची रक्कम मिळाली नाही, बोगस पंचनामे करून पिक विमा हडप करणाऱ्या पिकविमा अधिकारी व कृषी प्रतिनिधी यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, यासह अन्य मागण्यासाठी मोहोळ तालुका कृषी कार्यालया समोर औंढी ता मोहोळ येथील शेतकऱ्यांनी शनिवार ता 25 पासून बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे.
उपोषण कर्ते शेतकरी हनुमंत विठ्ठल साळुंखे रा औंढी यांनी दिलेल्या माहिती नुसार,औंढी ता मोहोळ येथील ज्ञानेश्वर नरसू पडसाळकर, राजेंद्र बब्रुवाहन भुसे, आनंद पांडुरंग बाबर, पांडुरंग मच्छिंद्र मोटे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी सन 2023/ 24 साली कांदा व निकषात बसणाऱ्या अन्य पिकांचा पीक विमा भरला होता.