Solapur Farmers: सोलापूर जिल्ह्यातील १२ हजार १५९ शेतकऱ्यांची शेततळे योजनेसाठी निवड; आता कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत

Solapur Farm Pond Scheme List Announced for 12159 Farmers: शेततळे योजनेसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर कागदपत्रे अपलोड करावीत
Maharashtra Farm Pond Scheme Selects 12159 Farmers in Solapur District Document Upload Deadline Set for One Month

Maharashtra Farm Pond Scheme Selects 12159 Farmers in Solapur District Document Upload Deadline Set for One Month

sakal

Updated on: 

सोलापूर : वैयक्तिक शेततळे योजनेत जिल्ह्यातील तब्बल १२ हजार १५९ शेतकऱ्यांची निवड झाली आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत ही निवड करण्यात आली असून राज्यभरातील सुमारे ७० हजार शेतकऱ्यांना संधी मिळाली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांकडून आता बँक खात्याची माहिती, हमीपत्रासह आवश्यक कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. कागदपत्रांची पूर्तता, जागेची पाहणी आणि अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर शेततळ्याच्या कामासाठी पूर्वसंमती दिली जाणार आहे.

Loading content, please wait...