

Solapur Crime News Shiva Organization Chief Bhinge Killed in Firing by Unknown Assailants Near His Isbavi Residence at Night
sakal
पंढरपूर : शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांचा अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. इसबावी येथील त्यांच्या राहत्या घराजवळ मंगळवारी (ता. १७) रात्री दहाच्या सुमारास हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भिंगे यांना तातडीने पंढरपुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.