

Flood Relief Stalled in Solapur 13000 Eligible Farmers Still Waiting for 46 Crore Compensation After Heavy Rains
sakal
सोलापूर: मागील वर्षी सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रशासनाकडून तयार करण्यात आली. जिल्ह्यातील २० हजार ४६८ बाधित शेतकऱ्यांसाठी एकूण ५७ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी १३ हजार २०४ शेतकऱ्यांना २३ कोटी ४४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात प्रशासनाकडून पंचनाम्यानुसार १३ हजार २०४ शेतकऱ्यांना २२. ४४ कोटी रुपये मंजूर केले. त्यातही आज अखेर ९४६८ शेतकऱ्यांच्याच खात्यावर ११ कोटी १४ लाख रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. अद्यापही १० हजार ९५३ शेतकऱ्यांना ४६ कोटी ४४ लाख रुपयांचे वाटप रखडले आहे.