
Madha Flood
Sakal
माढा : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सीना नदीकाठी शनिवारी (ता. २७) सकाळपासून पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे.पुराचे केंद्र ठरलेला उंदरगाव येथील सीना नदीवरील माढा - वैराग - तुळजापूरला जोडणारा पुल पाण्याखाली गेला आहे. गावांमधे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे.