Solapur Flood Relief
esakal
महापूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० हजारांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
आतापर्यंत १३,१९४ जणांच्या खात्यावर १३ कोटी १९ लाख ४० हजार रुपये जमा झाले आहेत.
शिल्लक १ कोटी ५० लाख ९० हजार रुपये १,५०९ जणांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत.
सोलापूर : अतिवृष्टी आणि महापुराचे पाणी घरात शिरल्याने नुकसान (Solapur Flood Relief) झालेल्यांना शासनाच्या वतीने प्रतिकुटुंब १० हजार रुपये दिले असून, आजपर्यंत जिल्ह्यातील १३ हजार १९४ जणांच्या खात्यावर १३ कोटी १९ लाख ४० हजार रुपये जमा झाले आहेत. मदत वाटपाचे १ कोटी ५० लाख ९० हजार रुपये शिल्लक असून ही मदत १ हजार ५०९ जणांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे.