
Flood-affected families in Solapur struggle with inadequate government relief; Congress raises concerns over ineffective aid distribution.
Sakal
सोलापूर: अतिवृष्टी व महापुराच्या संकटात सरकारने दिलेली मदत तुटपुंजी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मदतीबाबत सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही, असा दावा करत सोलापूर शहर काँग्रेसने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी पिठलं-भाकरी आणि ठेचा खाऊन प्रतीकात्मक काळी दिवाळी साजरी केली.