

Solapur Flyover News Old Poona Naka to Boramani Naka Project Awaits Work Order With Construction Expected to Start in March
sakal
सोलापूर : जुना पूना नाका ते पत्रकार भवन ते बोरामणी नाका या मार्गावरील उड्डाणपुलाची ६८८ कोटी रुपयांची निविदा बिल्डकॉन कंपनीला मंजूर झाली आहे. मात्र, अद्याप वर्कऑर्डर मिळालेली नसल्याने प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी मार्च महिना उजाडण्याची शक्यता आहे. जीएसटीसह निविदेची रक्कम सुमारे ८३० कोटी रुपयांवर पोहोचली असून, उड्डाणपुलाशी संबंधित अन्य कामांसाठी आणखी सुमारे ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च १, ४०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता महामार्ग विभागातील सूत्रांनी व्यक्त केली.