सोलापूर : अन्न प्रक्रिया उद्योगातून दहा जणांना रोजगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ‘सनराज’ नावाचे ब्रॅंड त्यांनी तयार केले आहे.

सोलापूर : अन्न प्रक्रिया उद्योगातून दहा जणांना रोजगार

सोलापूर : शहरातील राजस्व नगरातील महिला उद्योजिका नंदा सोनवणे यांनी आटा, बेसन, राईस पॉवडर व इतर उत्पादनांच्या माध्यमातून दहाजणांना रोजगार मिळवून दिला आहे. उत्पादनांना आकर्षक ब्रॅंडिंग व पॅकेजिंगने त्यांनी वेगळी ओळख मिळवली आहे. त्यांचे ‘सनराज’ नावाचे ब्रॅंड त्यांनी तयार केले आहे.

नंदा सोनवणे यांनी त्यांचे पती संजय सोनवणे यांच्या मदतीने एस. एस. ॲग्रो अँड फूड नावाने व्यवसायाची नोंदणी केली. सुरवातीला त्यांनी राईस पावडर, बेसन आणि आटा निर्मिती सुरू केली. त्यावेळी शहरात बेसन उत्पादन कमी प्रमाणात केले जात होते. पण वडापाव व पकोडे उत्पादकांची मागणी भरपूर होती. त्यामुळे ही संधी म्हणून नंदा सोनवणे यांनी अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीमध्ये उद्योगाची उभारणी केली. त्यासाठी त्यांनी तीस लाख रुपये गुंतवून यंत्रसामग्री आणली. त्यामुळे उत्पादनात सातत्य आले व उत्पादन क्षमता विस्तारली. बेसन अणि राईस पावडर निर्मितीत जम बसल्यावर त्यांनी इतर उत्पादने घेण्यास सुरवात केली. केसरी रवा, चक्की आटा, वाटाणा बेसन, ज्वार आटा, दाल बेसन, पकोडा बेसन, साखर पावडर यांसारखी उत्पादने बाजारपेठेत आणली आहेत.

या सर्व उत्पादनांच्या बाबतीत त्यांनी स्थानिक आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या बाजारात योग्य पद्धतीने उत्पादने पोचवली. वडापाव व इतर छोटे खाद्यपदार्थ आणि फरसाण उत्पादकांना फॅक्टरी भाव देऊन त्यांनी एक सामाजिक बांधिलकी जपली. व्यावसायिक स्तरावर त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता, पॅकिंग व ब्रॅंडिंगचा दर्जा सांभाळत मोठ्या व्यावसायिक उत्पादनांशी स्पर्धा ठेवण्याची तयारी सुरवातीपासून केली. त्यांच्या कारखान्यात त्यांनी दहाजणांना प्रत्यक्ष रोजगार निर्माण करून दिला आहे. ही उत्पादने पुढील काळात वाढवण्याचा त्यांचा मानस आहे.

Web Title: Solapur Food Processing Industry Employs Ten

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top