Solapur : दिवसात चार दुचाकी अन्‌ एक रिक्षा चोरीला

दुचाकींची चोरी वाढली; चोरट्यांचे पोलिसांनाच आव्हान
solapur
solapursakal

सोलापूर : जानेवारी ते १४ सप्टेंबर या काळात शहरातून तब्बल १०० पेक्षा अधिक दुचाकींची चोरी झाली आहे. त्यातील काही दुचाकी पोलिसांनी शोधून चोरट्याना जेरबंद पण केले. मात्र, दुचाकी व रिक्षांची चोरी नियंत्रणात आलेली नाही. पोलिसांची कारवाई सुरु असतानाही चोरट्याने दुचाकी चोरी सोडलेली नाही, हे विशेष.

दीपक लक्ष्मण पासलकर (रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर) यांची दुचाकी (एमएच १३, डीपी ४७९२) चोरट्याने चोरून नेली. हॅण्डल लॉक करून मुरारजी पेठेतील खान मशिदीशेजारील रोडवर लावलेली दुचाकी चोरट्याने पळवून नेल्याचेही पासलकर यांनी फौजदार चावडी पोलिसांना सांगितले. कृष्णदास दशरथ खैरमोडे (रा. वसंत विहार, संकेत थोबडे नगर) यांची दुचाकी (एमएच १३, सीए ४५९२) चोरट्याने पुणे महामार्गावरील संकेत थोबडे नगर येथून हॅण्डल लॉक तोडून नेली आहे. त्यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

प्रसाद तायप्पा सोनकांबळे (रा. गजानन नगर, होटगी रोड) यांची दुचाकी (एमएच १३, सीजी ९४५८) चोरट्याने सात रस्त्याजवळील यशवंतराव चव्हाण पुतळ्याजवळून चोरल्याचेही त्यांनी सदर बझार पोलिसांना सांगितले. तर विलास दत्तात्रय साळुंखे (रा. राघवेंद्र नगर, ७० फुट रोड, निलमनगर) यांची दुचाकी (एमएच १३, एई ३५५६) चोरट्याने कंबर तलावाजवळील पार्किंगमधून पळवून नेल्याची फिर्याद त्यांनी सदर बझार पोलिसांत दिली. दुसरीकडे मोहमद अ. कादर चांदा (रा. मार्कंडेय नगर, कुमठा नाका) यांची रिक्षा (एमएच १३, सीटी ३२६३) चोरट्याने राहत्या घरासमोरून चोरून नेली असून त्यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. दुचाकी व रिक्षा चोरट्यांचा शोध आता पोलिसांनी सुरु केला आहे. शहरातून दुचाकी चोरींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com