Solapur: धनगर समाजातील शिक्षणाचा टक्का वाढवण्यासाठी वसतीगृहासाठी निधी देऊ - आ.समाधान आवताडे

लढवय्या राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास आजही प्रेरणादायी|
Solapur: धनगर समाजातील शिक्षणाचा टक्का वाढवण्यासाठी वसतीगृहासाठी निधी देऊ - आ.समाधान आवताडे
Solapur sakal

MangalVedha News: राजमाता अहिल्यादेवींनी सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाचा मोठा प्रसार केला. त्यांच्या सर्वसमावेशक शैक्षणिक धोरणांचा अवलंब करून धनगर समाजातील शिक्षणाचा टक्का वाढवण्यासाठी तालुक्यात वसतीगृहासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देतो अशी ग्वाही आ.समाधान आवताडे यांनी दिली.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त नंदेश्वर येथे ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर, भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हा चेअरमन अनिल सावंत, माजी उपसभापती दादासाहेब गरंडे, तानाजी काकडे, शिवसेना तालुकाध्यक्ष अशोक चौंडे, जगन्नाथ रेवे, दत्ताभाऊ साबणे, मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. आवताडे म्हणाले की, सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी ते उत्तर भारताची सम्राज्ञी हा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता मुलगा पती आणि सासऱ्याच्या निधनानंतर त्यांनी परिस्थितीवर मात करून मोठ्या हिमतीने राज्यकारभार चालवला व विहिरी बारवा घाट मठ मंदिरांचा जिर्णोद्धार केला. इंदूरच्या राज्यावर राघोबा दादा पेशवे चालून आले असताना त्यांनी त्यांना लिहिलेले खरमरीत पत्र आज ही त्यांच्या शौर्याची साक्ष देते.

अहिल्यादेवी होळकर राघोबांना म्हणाल्या, माझ्या राज्याचे संरक्षण करण्यासाठी मी समर्थ आहे माझा पराभव झाला तर एका स्त्रीचा तो पराभव असेल परंतु राघोबा दादा तुमचा पराभव झाला. तर एका महिलेने तुमचा पराभव केला आम्ही तुम्हाला चोळी बांगडीचा आहेर पाठवू तुम्हाला साखळदंडाने हत्तीच्या पायी बंधून इंदूरमध्ये फिरवू. खरमरीत पत्र लिहिल्यानंतर राघोबा दादा वरमले आणि आपल्या सैन्य घेऊन माघारी फिरले. अशा लढवय्या राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास आजही प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com